ढाका : बांगलादेशकडून अंडर १९ विश्वचषक खेळणार्‍या संघाचा सदस्य असलेल्या मोहम्मद सोजीबने शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी घरी आत्महत्या केली. २०१५ मध्ये सैफ हसनच्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्ड कप खेळणारा २१ वर्षांचा सोजीब या संघात होता. त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून न्यूझीलंडला पाठवले गेले होते पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा मिळाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या उजव्या हाताच्या फलंदाजाच्या मृत्यूच्या बातमीबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला आहे. बीसीबीचे गेम डेव्हलपमेंट मॅनेजर अबू इनाम मोहम्मद यांनी युवा क्रिकेटच्या मृत्यूचे अत्यंत दुःखद वर्णन केले आहे. ते म्हणाले की, बंगबंधू टी-20 कपसाठी ड्राफ्टमध्ये सोजीबचे नाव नव्हते. यामुळे, तो खूप निराश झाला होता आणि हे त्याच्या आत्महत्येचे एक कारण असू शकते.



अबू यांनी म्हटलं की, 'सोजीब अंडर 19 संघाचा भाग होता, सन 2018 मध्ये सैफ आणि आफिफ होसैन बॅचचा खेळाडू होता. तो वर्ल्ड कपचा स्टँडबाय खेळाडू होता. आशिया चषकात श्रीलंकेविरूद्धही खेळला होता. ही बातमी ऐकून मला खरोखर वाईट वाटले.'


तो नैराश्याने ग्रस्त होता की इतर काही कारणास्तव हे सांगणे फार कठीण आहे. गेल्या काही वर्षांपासून तो सतत क्रिकेटही खेळत नव्हता. तो फर्स्ट डिव्हिजन आणि ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळला.