बांग्लादेशला तिसरा धक्का, फॉर्ममध्ये असलेला तमीम इक्बाल आऊट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशला तिसरा धक्का बसला आहे.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशला तिसरा धक्का बसला आहे. ३१ ओव्हरनंतर बांग्लादेशचा स्कोअर १६४/३ या चॅम्पियन्स फॉर्ममध्ये असलेल्या तमीम इक्बालला केदार जाधवनं बोल्ड केलं आहे. तमीम इक्बालनं ८२ बॉल्समध्ये ७० रन्सची खेळी केली. तमीमनं मुशफिकूर रहीमबरोबर १२३ रन्सची पार्टनरशीप केली आणि बांग्लादेशचा डाव सावरला.
या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले. भुवनेश्वर कुमारनं या दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.