कोलकाता : ईडन गार्डन हे सध्या भारतीय उपखंडातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. पण पुढच्या दोन वर्षांमध्ये ईडन गार्डनचा हा मान जाऊ शकतो. बांगलादेशमध्ये बनणारं नवीन क्रिकेट स्टेडियम ईडन गार्डनला टक्कर देणार आहे. बांगलादेशच्या पूर्बाचलमध्ये जगातलं सर्वश्रेष्ठ स्टेडियम बांधण्यात येणार आहे, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी दिली आहे. या स्टेडियमचं नाव पंतप्रधान शेख हसीना यांच्या नावानं देण्यात येणार आहे. कोलकात्यामध्ये आयसीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे.


बांगलादेशमध्ये बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियममध्ये कमीत कमी ५० हजार प्रेक्षक बसू शकतील, असं हसन यांनी सांगितलं. ईडन गार्डनमध्ये सध्या ६८ हजार दर्शक बसू शकतात. बांगलादेशमधलं हे स्टेडियम बांधण्यासाठी सध्या जमिन अधिग्रहणाचं काम सुरु आहे. हे अधिग्रहण झाल्यानंतर स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.