Bangladesh Crisis: बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सरकारविरोधी निदर्शनं आणि दंगली सुरु असताना माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. यावेळी त्या देश सोडून हेलिकॉप्टरने भारतात दाखल झाला. हजारो आंदोलकांनी पंतप्रधान निवास स्थानावरही हल्ला चढवला. दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा करण्यात येतोय की, दंगलखोरांनी बांगलादेश क्रिकेट टीमचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दास आणि माजी खासदार क्रिकेटपटू मशरफी मोर्तझा यांची घरं जाळण्यात आली आहेत.


क्रिकेटपटू लिटन दास यांचं घर जाळलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटनचे घर जाळल्याची बातमी पसरली होती. मात्र, एका बांगलादेशी पत्रकाराने एक्सवर पोस्ट लिहिताना ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. लिटन दाससोबत अशी घटना घडली नसल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, 30 मिनिटांत एका खोट्या बातमीवर 6k लाइक्स आहे. (हे मुशरफे मोर्तझाचे घर आहे) आपल्या देशात भीती आणि फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.


व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जाळलेले घर हे लिटन दासचे नसून बांगलादेशचा माजी कर्णधार मुशरफे मोर्तझा यांचं आहे, असा दावा त्यांनी केला. अनेक मोठ्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या विजयात हिरोची भूमिका बजावणारा क्रिकेटपटू म्हणजे लिटन दास. असं असूनही, ज्यावेळी तो सोशल मीडियावर आपल्या देवाचे फोटो शेअर करतो किंवा एखाद्या सणावर काही पोस्ट करतो तेव्हा कट्टरतावादी त्याला ट्रोल करणं सोडत नाही.


पंतप्रधान निवासस्थानाची केली तोडफोड


याशिवाय पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या आलिशान 'गणभवन'वरही जमावाने हल्ला केला. जमावाने त्यांचा टीव्ही, फर्निचर आणि इतर अनेक वस्तू नेल्या. शेख हसीना यांचे वडील मुजीब उर रहमान यांचा वारसा पुढे चालू ठेवत तिने गेल्या 30 वर्षांपैकी 20 वर्षे बांगलादेशचं नेतृत्व केलं. त्यांची 1975 मध्ये त्यांच्या कुटुंबासह हत्या झाली.


भारतात आल्यानंतर शेख हसीना यांचा मुलगा जॉय यांनी खुलासा केला की, शेख हसीना यांना बांगलादेशात राहायचं आहे, परंतु कुटुंबाने त्यांना सुरक्षिततेसाठी देश सोडण्याचा आग्रह केला, म्हणून त्यांनी तसं करण्याचा निर्णय घेतला. शेख हसीना यांना देश सोडायचा नव्हता. आम्हाला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रथम काळजी वाटली, म्हणून आम्ही त्यांना तेथून निघून जाण्यास पटवून दिलं.