मुंबई: फास्ट बॉलरने केलेल्या मारहाणी प्रकरणानंतर त्याच्यावर 5 वर्षांसाठी बंद लावण्यात आली होती. मात्र ही बंदी मागे घेण्यात आली असून हा बॉलर पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शहादत हुसेनवर 5 वर्षांसाठी क्रिकेटवर बंदी होती. या खेळाडूने नोव्हेंबर 2019 मध्ये सामन्यादरम्यान स्वत:च्या संघातील खेळाडूला मारहाण केली होती. त्यानंतर अपंयारने शहादतची तक्रार केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहदत हुसेनने फर्स्ट क्लास मॅच दरम्यान आपल्या संघातील खेळाडूला मारहाण केली होती. या प्रकरणी त्याच्यावर 5 वर्षांसाठी बंदी लावण्यात आली. मात्र हा खेळाडू 18 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुन्हा खेळताना दिसला आहे. 


क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार या संदर्भात बांग्लादेश क्रिकेट बोर्डकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहदतला आता लावण्यात आलेला बंदीचा कालावधी पूर्ण करण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे. 18 महिन्यांनंतर पुन्हा एकदाल्ड डीओएचएस स्पोर्ट्स क्लब विरुद्ध तो मैदानात खेळताना दिसला. त्याने 2 ओव्हर्स बॉलिंग केली. 


बीसीबी क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष अक्रम खान यांनी काही महिन्यांपूर्वी सोमॉय टीव्हीवर या संदर्भात एक निवेदन दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या शाहदत हुसेन आपल्या कुटुंबासोबत अनेक समस्यांचा सामना करत आहे. त्याच्या आईला कर्करोग आहे. त्यामुळे मी क्रिकेट बोर्डला विनंती केली. तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील बोलणं झालं आहे. आशा आहहे की तो एनसीएलसाठी खेळू शकेल.'