मुंबई : टीम इंडियाचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झालं आहे. बापू नाडकर्णी हे ८७ वर्षांचे होते. बापू नाडकर्णी त्यांच्या मुलीकडे मुंबईत हिरानंदानी गार्डन येथे राहत होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उजव्या हाताचे गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी इंग्लंड टीमविरोधात सर्वाधिक २१ ओव्हर एकही रन न काढू देता टाकल्या होत्या. तो रेकॉर्ड आजही अतूट आहे. 


बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी आपल्या परिवारासह मुंबईत राहत होते. बापूंचा जन्म ४ एप्रिल १९३३ रोजी झाला. ते १३ वर्षांचे असल्यापासून टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळत होते.



बापू नाडकर्णी यांनी १६ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंडविरोधात खेळताना दिल्लीत टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ते १९६८ पर्यंत टीम इंडियाकडून खेळत राहिले. 


४१ कसोटी सामन्यात त्यांनी ६५ डावात ८८ विकेट घेतल्या. हैराण करणारी बाब म्हणजे त्यांच्या करिअरचा इकॉनमी रेट १.७ रन प्रति ओव्हर होता. बापू नाडकर्णी यांनी १४१४ धावा काढल्या, ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.