पाकिस्तानची घातक बॉलिंग... नेदरलँडचा खेळाडू रक्तबंबाळ; थोडक्यात वाचला डोळा; पाहा Video
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान टीमने आज पर्थमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला.
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. पाकिस्तानला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान टीमने आज पर्थमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला. मात्र या सामन्यात हॅरिस राउफचा तो घातक गोलंदाज चांगलाच चर्चेत आला आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊसने इतकी धोकादायक गोलंदाजी केली की नेदरलँडच्या एका फलंदाजाला जखली केलं आहे.
नेदरलँडच्या डावातील सहाव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर हॅरिसने बॉल टाकला आणि बॉल पाहून नेदरलँडच्या फलंदाजाने शॉट खेळण्यासाठी बॅट फिरववली. पण चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला जोरात लागला. बॉल त्याला इतका जोरात लागला की तो पाहून पाकिस्तानी क्रिकेटर त्याच्याकडे धावला आणि फिजिओलाही बोलावण्यात आलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर खोलवर जखम झाली की तिथे खूण निर्माण झाली. यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. बॉल इतका जोरात लागला की बास डी लीड बॅटिंगला परतलाच नाही.
पाकिस्तानचा पहिला विजय
पाकिस्तान संघाने टी-20 वर्ल्ड कपमधील आपला पहिला विजय मिळवला आहे. नेदरलँड संघाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. नेदरलँड संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर नेदरलँडने 91 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान संघाने हे आव्हान 36 चेंडू राखून विजय मिळवला आहे.