जोहानस्बर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही भारतीय बॅट्समननी लोटांगण घातलं आहे. ८ विकेट्स गमावल्यानंतर भारताचा स्कोअर कसाबसा १५०च्या पार गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारताला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. ओपनर के.एल.राहुल शून्य रन्सवर तर मुरली विजय ८ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहली ५४ रन्सवर तर चेतेश्वर पुजारा ५० रन्स करून आऊट झाला. पण या सगळ्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावावर एक लाजिरवाणं रेकॉर्ड झालं आहे. ५३ बॉल्स खेळल्यावर चेतेश्वर पुजाराला पहिली रन काढता आली.


पुजारा आणि विराटची विकेट पडल्यानंतर भारताची बॅटिंग गडबडली. भारतीय टीममध्ये पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे ९ रन्सवर आऊट झाला. हार्दिक पांड्या शून्य रनवर आणि पार्थिव पटेल २ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्कल, फिलँडर आणि पेहलुक्वायोला प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या तर रबाडा आणि एनगिडीला प्रत्येकी एक-एक विकेट घेण्यात यश आलं. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा