Who is BB Nimbalkar: रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023) मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने ट्रिपल सेंच्यूरी ठोकली (Prithvi Shaw Triple Century) आहे. पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने या धावा करताच तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दरम्यान रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर आहे. त्यामुळे बीबी निंबाळकर कोण आहेत? त्यांची रणजी ट्रॉफितली वैयक्तिक कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात. 


पृथ्वी शॉचे त्रिशतक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw Triple Century) आसामविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार त्रिशतक ठोकले. रियान परागने त्याला एलबीडब्ल्यू बाद करून 400 धावांच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून रोखले.पृथ्वीने 383 चेंडूत 379 धावा केल्या आहेत. या खेळीतत त्याने 4 षटकार आणि 49 चौकार लगावले आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 98.96 होता. पृथ्वी शॉने या धावा करताच तो रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy 2023) इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यासोबतच पृथ्वी शॉने सुनील गावस्कर आणि चेतेश्वर पुजाराला मागे टाकले आहे. गावस्कर यांचा रणजी ट्रॉफीमधील सर्वोच्च धावसंख्या 340 आहे. त्याचवेळी पुजाराने 2012 मध्ये कर्नाटकविरुद्ध 352 धावा केल्या होत्या.


बीबी निंबाळकर यांची सर्वोच्च खेळी


रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम महाराष्ट्र संघाचे माजी फलंदाज बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर नोंदवला गेला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्रासाठी काठियावाडविरुद्ध नाबाद 443* धावा ठोकल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात 400 धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले फलंदाज ठरले होते. आता पर्यंत कोणत्याच खेळाडूला हा रेकॉर्ड मोडता आला नव्हता.  


रेकॉर्ड 73 वर्षापासून कायम 


बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांची ती खेळी सर डॉन ब्रॅडमनच्या नाबाद 452* नंतर, त्या काळातील दुसरी सर्वोच्च प्रथम श्रेणी खेळी होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही चौथी सर्वात मोठी खेळी आहे.रणजी ट्रॉफीमध्ये इतका मोठा विक्रम करून देखील निंबाळकरांना टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचा हा विक्रम रणजी ट्रॉफीमध्ये 73 वर्षांपासून कायम आहे. पृथ्वी शॉला हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र तो 379 धावा करून आऊट झाला होता. 


ब्रॅडमन यांनी केलं निंबाळकरांच कौतुक 


बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांना ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची मोठी संधी होती. पण लंच दरम्यान प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार राजकोटच्या ठाकूर साहेबांनी आपल्या संघाला पेचातून वाचवण्यासाठी पराभव स्वीकारला होता. आणि सामना संपला होता. त्यामुळे निंबाळकरांना ब्रॅडमनचा विक्रम मोडता आला नव्हता. या सामन्यानंतर स्वत: सर डॉन ब्रॅडमन यांनी निंबाळकरांना वैयक्तिक चिठ्ठी पाठवून त्याच्या खेळाचे कौतुक केले होते. तसेच निंबाळकरांची खेळी त्यांच्या खेळापेक्षा चांगली असल्याचे वर्णन केले होते. 


कारकिर्द 


बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1939-40 ते 1964-65 या कालावधीत एकूण 80 सामने खेळले होते. या सामन्यात निंबाळकरांनी 118 डावात 17 वेळा नाबाद राहून 47.93 च्या सरासरीने 4 हजार 841 धावा केल्या होत्या.यादरम्यान त्याने 12 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली होती. तसेच निंबाळकरांनी वेगवान गोलंदाजीच्या जोरावर 58 विकेट्स देखील घेतल्या होत्या. 


दरम्यान य़ुवा खेळाडू पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) बीबी निंबाळकरांचा (BB Nimbalkar) रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. मात्र तो 379 धावा करून आऊट झाला. त्यामुळे बीबी निंबाळकरांचा रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम कायम राहिला.