मुंबई : टीम इंडिया विरुद्द पाकिस्तान (Team India vs Pakistan Series) या 2 पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही. हे दोन्ही टीम सध्या आयसीसीच्या (ICC) स्पर्धेतच खेळताना दिसतात. या दोन्ही संघामध्ये द्विपक्षीय मालिकेचं आयोजन व्हावं, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा असते. मात्र दोन्ही देशातील संबंधामुळे अनेक वर्ष दिपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी काहीशी गूड न्यूज आहे. (bcci and pcb will be discuss team india vs pakistan series at dubai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंइिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) उत्साहित आहेत.  पीसीबीचे चेयरमन रमीज राजा (Pcb Chief Ramiz Raza) यांनी या द्विपक्षीय मालिका आग्रही आहेत. दोन्ही टीममध्ये मालिका खेळवण्याबाबत महत्तवपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुबईत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही संघातील द्विपक्षी मालिका आणि चौरंगी मालिकेबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.


केव्हा होणार बैठक?


दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक ही 7 ते 10 एप्रिलदरम्यान होणं अपेक्षित आहे. दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या या बैठकीसाठी दोन्ही क्रिकेट बोर्डाचे अधिकारी पोहचलेले आहेत. 


पाकिस्तान मीडियानुसार, या बैठकीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी हे द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेतील.  


चौरंगी टी 20 मालिकेबाबत निर्णय


या बैठकीत पीसीबीकडून चौरंगी टी 20 मालिकेबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या चौरंगी मालिकेत टीम इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार पक्षांचा समावेश असणार आहे. 


मात्र टीम इंडियाकडून अनेकदा या अशा मालिकेच्या आयोजनाची संभावना कमी असल्याचं स्पष्ट केलं होतं.   


तसेच पीसीबीने याआधी टीम इंडिया विरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी उत्सुकता दाखवली. मात्र बीसीसीआयने नकार दर्शवला. त्यामुळे अशात द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता फारच कमी आहे.  


टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अखेरची द्विपक्षीय मालिका ही 2013 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर आली होती. पाकिस्तानने ही 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.


पहिल्या वनडेत पाकिस्तानने टीम इंडियावर 6 विकेट्सने मात केली होती. दुसऱ्या सामन्यात 85 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर टीम इंडियाने तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून शेवट गोड केला होता. 


मात्र त्यानंतर दोन्ही देशांमधील ताणल्या गेलेल्या संबंधामुळे आतापर्यंत द्विपक्षीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे आता या बैठकीत या दोन्ही मालिकांबाबत काय निर्णय होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.