मुंबई : आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 15 व्या  मोसमाचं (IPL 2022) बिगूल वाजलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 15 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर (IPL 2022 Schedule Announced)  केलं आहे. 15 व्या मोसमाची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. तर 29 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.याबाबतची माहिती ट्विट करुन देण्यात आली आहे. ( bcci announced ipl 15th season time table 70 league matches held in  4 venues in maharashtra see full time table 10 team divided in 2 groups) 
 
या मोसमात एकूण 70 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. या साखळी फेरीतील सामन्यांचं आयोजन महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबईसह पुणे शहरात करण्यात आलं आहे. तर प्लेऑफ सामन्याचं ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विटद्वारे दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साखळी फेरीत एकूण 70 सामने 


या 15 व्या मोसमात साखळी फेरीत एकूण 70 सामने होणार आहेत. या 70 सामन्याच्या आयोजनाचा मान हा महाराष्ट्राला मिळाला आहे. हे 70 सामने हे मुंबईतील वानखेडे आणि बेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजे स्टेडियम करण्यात आलं आहे. 


यापैकी वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियममध्ये 20, तर गहुंजे आणि बेबॉर्नमध्ये प्रत्येकी 15 अशा एकूण 70 साखळी सामन्यांचं या 4 स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं आहे. 


2 नवे संघ


या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद दोन संघ नव्याने जोडले गेले आहेत. त्यामुळे एकूण संघाची संख्या ही 10 झाली आहे. त्यानुसार या 10 संघांची विभागणी आयपीएल 2011 नुसार दोन ग्रृपमध्ये करण्यात आली आहे. या एकूण 10 संघांची विभागणी प्रत्येकी 5 यानुसार 12 गटात करण्यात आली आहे.  


कोणत्या गृपमध्ये कोणती टीम   


ग्रृप ए 


मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट रायडर्स 
राजस्थान रॉयल्स 
दिल्ली कॅपिट्ल्स
लखनऊ सुपर जायंट्स


ग्रृप बी  


चेन्नई सुपर किंग्स
सनरायजर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
पंजाब किंग्स 
गुजरात टायटन्स