BCCI announced prize money : टीम इंडियाने आपल्या अफलातून कामगिरीचं प्रदर्शन करत टी-ट्वेंटी विश्वचषकावर (T20 World Cup 2024) नाव कोरलं. टीम इंडियाच्या सांघिक खेळाच्या जोरावर बलाढ्य साऊथ अफ्रिकन संघावर मात करता आली. अशातच आता बीसीसीआय (BCCI) देखील टीम इंडियाच्या कामगिरीवर खुश असल्याचं पहायला मिळतंय. बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी टीम इंडियाचं अभिनंदन करत बक्षिस जाहीर केलंय. जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली. 


काय म्हणाले Jay Shah ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केलं आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन, असंही जय शहा यांनी म्हटलं आहे.



जय शहांची भविष्यवाणी ठरली खरी


अहमदाबाद येथे 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. त्यावेळी देखील जय शहा यांनी टीम इंडियाची पाठराखण केली अन् बार्बाडोसमध्ये नक्कीच आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय झेंडा फडकवू, असं जय शहा यांनी म्हटलं होतं. अशातच आता रोहित शर्माने देखील बार्बाडोसच्या ग्राऊंडवर तिरंगा रोवला. 


टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.