मुंबई : बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा कर्णधार करण्यात आलंय. (bcci announced team india squad against zimbabwe 3rd match odi series shikhar dhawan again captain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडिजला 3-0 ने पराभूत केल्यानंतर याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा असणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मासह अनुभवी खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.



दोन खेळाडूंची एन्ट्री


या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहरचं संघाच पुनरागमन झालंय. हे दोघे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते. तर राहुल त्रिपाठीला पुन्हा एकदा संधी दिली आहे. टीम इंडियाचा विंडिज दौरा 7 ऑगस्टला संपणार आहे. यानंतर भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.  


झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया :  शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.