मुंबई : १२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचं पुनरागमन झालं आहे. तर धोनीचं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी पुनरागमन झालं आहे. याआधी धोनीला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी टीममध्ये जागा मिळाली नव्हती. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी कृणाल पांड्या टीममध्ये कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज १२ जानेवारीपासून सिडनीमधून सुरु होईल. यानंतर दुसरी वनडे १५ तारखेला ऍडलेडमध्ये, तिसरी आणि शेवटची वनडे १८ तारखेला मेलबर्नमध्ये होईल. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत वनडे सीरिज होईल. तर ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅचची सीरिज खेळवली जाईल.


ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी



न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद



या टीममध्ये धोनीच्या टी-२० टीममधील पुनरागमनाशिवाय कोणताही अनपेक्षित निर्णय घेण्यात आलेला नाही. वर्ल्ड कपपर्यंत आता भारतीय टीममध्ये कोणतेही प्रयोग होणार नसल्याचं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी याआधीच सांगितलं होतं.