मुंबई : दरवर्षी IPL होतं, उत्कृष्ट खेळपट्टी तयारी केली जाते, या खेळपट्टींवर सामने होतात. यानंतर हंगामाचा अंतिम सामना होतो आणि एखादा उत्कृष्ट संघ आयपीएलवर आपले नाव कोरून ट्रॉफी उंचावतो.यानंतर विदेशी खेळाडू आपल्या मायदेशी तर भारतीय खेळाडू आपल्या घरी परतणार आहेत. मात्र यावर्षीचं चित्र थोड वेगळं आहे. या हंगामात आयपीएल विजेत्या खेळाडूंसोबत ग्राऊंड स्टाफवरही बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2022 च्या ट्रॉफीवर कर्णधार हार्दीक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने नाव कोरले. या विजयानंतर विजेत्या खेळाडूंवर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. मात्र एवढ्यावरचं बीसीसीआय थांबली नाही तर त्यांनी ग्राऊंड स्टाफला देखील बक्षीस जाहीर केले. आयपीएल 2022 यशस्वी करण्यात क्युरेटर्स आणि फील्ड कर्मचार्‍यांनीही मोलाचे योगदान दिले होते. आता बीसीसीआयने क्युरेटर्स आणि फील्ड वर्कर्सला एक कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेय.


काय म्हणाले बीसीसीआयचे सचिव ?
टाटा आयपीएल 2022 मध्ये ग्राऊंड स्टाफने आम्हाला सर्वोत्तम सामने पाहण्याचा अनुभव दिला.मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. या अनसंग हिरोजना 1.25 कोटीचे बक्षीस जाहीर करताना मला आनंद होत असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून सांगितले.  


पुण्यातील सीसीआय, वानखेडे, डीवाय पाटील आणि एमसीए स्टेडियमच्या क्युरेटर आणि क्षेत्रीय कार्यकर्त्यांसाठी प्रत्येकी 25 लाख आणि ईडन गार्डन्स आणि नरेंद्र मोदी स्टेडियमसाठी प्रत्येकी 12 लाख 50 हजाराचे बक्षीस जाहीर करत असल्याची माहिती जय शाह यांनी दिली.