BCCI Selection Committee : BCCI ने  सोमवारी टीम इंडियासाठी नव्या सिलेक्शन समितीची ( BCCI Selection Committee ) घोषणा केली आहे. ही सिलेक्शन समिती महिला क्रिकेट टीमसाठी आहे. याचसोबत बीसीसीआयने ज्युनियर खेळाडूंच्या निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केलीये. BCCI ने भारतीय महिला क्रिकेटपटूंची मुख्य निवडकर्ता म्हणून माजी भारतीय महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड यांची नियुक्ती केलीये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या घोषणेनुसार, टिळक नायडू यांची ज्युनियर क्रिकेटपटूंच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला क्रिकेट पटूंसाठी ही नवी सिलेक्शन टीम असणार आहे. 


भारतीय महिला क्रिकेट टीमची सिलेक्शन कमिटी ( BCCI Women's Selection Committee )


बीसीसीआयने नुकतीच भारतीय महिला क्रिकेटची निवड समिती ( BCCI Selection Committee ) जाहीर केलीये. यामध्ये महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिडची चिफ सिलेक्टर म्हणून नियुक्ती केली गेलीये. नीतू डेव्हिड यांच्या व्यतिरिक्त रेणू मार्गारेट, आरती वैद्य, कल्पना व्यंकटचार आणि श्यामा डी शॉ यांची महिला निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.


कोण आहेत नीतू डेव्हिड?


नीतू डेव्हिड या टीम इंडियाच्या ( Team India ) माजी खेळाडू आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 10 टेस्ट सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 1.74 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत 16 डावांमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 97 वनडे सामने खेळलेत. वनडे सामन्यात त्यांनी 2.82 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी करत 141 विकेट्स घेतल्यात.


कशी आहे ज्युनियर क्रिकेटर्सची सिलेक्शन समिती?


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने VS टिळक नायडू यांना ज्युनियर क्रिकेटपटूंच्या चिफ सिलेक्टरपदाची धुरा दिलीये. व्हीएस टिळक नायडू व्यतिरिक्त, भारताच्या ज्युनियर क्रिकेटपटूंच्या निवड समितीमध्ये रणदेव बोस, हरविंदर सिंग सोधी, पथिक पटेल आणि कृष्ण मोहन यांचा समावेश आहे. 


महिला चयन समिती: नीतू डेविड (अध्यक्ष), रेणु मार्गरेट, आरती वैद्य, कल्पना वेंकटचा, श्यामा डे शॉ.


जूनियर क्रिकेट समिती: वीएस तिलक नायडू (चेयरपर्सन), राणादेव बोस, हरविंदर सिंह सोढ़ी, पथिक पटेल, कृष्ण मोहन.