मुंबई : बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे. बीसीसीआयनं खेळाडूंना मिळणारी रक्कम इतर देशांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेएवढीच आहे पण महिला क्रिकेट टीमला देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये भेदभाव करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुष टीमच्या ए प्लस ग्रेडमध्ये खेळाडूंना ७ कोटी रुपये मिळणार आहेत. तर महिलांच्या टॉप ग्रेड खेळाडूंना ५० लाख रुपये मिळणार आहेत. पुरुषांच्या टीमच्या ४ ग्रेड बनवल्या आहेत. यातली सगळ्यात खालची ग्रेड सी आहे. सी ग्रेडमध्ये असलेल्या पुरुष खेळाडूंना १ कोटी रुपये मिळणार आहेत म्हणजेच पुरुष टीमच्या सर्वात खालच्या ग्रेडपेक्षाही कमी पैसे महिला टीमच्या सगळ्यात वरच्या ग्रेडला मिळणार आहेत.


एकही मॅच न खेळणाऱ्या खेळाडूला १ कोटी, रेकॉर्ड करणाऱ्या महिलांना ५० लाख


पुरुष टीममधल्या वर्षाला एकही मॅच न खेळणाऱ्या खेळाडूला १ कोटी रुपये मिळणार आहेत. तर वर्ल्ड कपची फायनल गाठून इतिहास घडवणाऱ्या महिला खेळाडूंना त्यापेक्षा अर्धे म्हणजे ५० लाख रुपये मिळणार आहेत.


जयंत यादव या खेळाडूला बीसीसीआयनं सी ग्रेडमध्ये ठेवलं आहे म्हणून त्याला वर्षाला १ कोटी रुपये मिळणारेत. जयंत यादव मागच्या वर्षात टेस्ट, वनडे आणि टी-20 खेळलेला नाही. तर महिला टीमच्या ए ग्रेडमध्ये असलेल्या मिताली राज, स्मृती मंधना, हमनप्रीत कौर आणि झुलन गोस्वामीला वर्षाला ५० लाख रुपये मिळतील.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झालेल्या टेस्टमध्ये जयंत यादव शेवटचा खेळला होता. त्यानंतर भारतीय टीममध्ये त्याला संधी मिळाली नाही. या कालावधीमध्ये हरमनप्रीत कौरनं १७ वनडे आणि ५ टी-20 मॅच खेळल्या आहेत. मिताली राज आणि स्मृती मंधनानंही जवळपास तेवढ्याच मॅच खेळल्यात.


पुरुष खेळाडूंची ग्रेडिंग सिस्टिम


ग्रेड ए प्लस (७ कोटी रुपये)


विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह


ग्रेड ए (५ कोटी रुपये)


अश्विन, रविंद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, वृद्धीमान सहा


ग्रेड बी (३ कोटी रुपये)


के.एल.राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक


ग्रेड सी (१ कोटी रुपये)


केदार जाधव, मनिष पांडे, अक्सर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव


महिला खेळाडूंची ग्रेडिंग सिस्टिम


ग्रेड ए (५० लाख रुपये)


मिताली राज, हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, स्मृती मंधना


ग्रेड बी (३० लाख रुपये)


पूनम यादव, वेदा कृष्णमूर्ती, राजेश्वरी गायकवाड, एकता बिश्त, शिखा पांडे, दीप्ती शर्मा


ग्रेड सी (१० लाख रुपये)


मानसी जोशी, अनुजा पाटील, मोना मेश्राम, नुजहत परवीन, सुषमा वर्मा, पूनम राऊत, जमीमाह रोड्रीग्ज, पूजा वस्त्रकर, तानिया भाटीया