मुंबई: टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून काही नियम आणि अटी अद्यापही समोर येणं बाकी आहे. सर्वजण या नियमांची वाट पाहात आहेत. BCCIने आयसीसीसमोर काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCIने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इंग्लंडच्या साउथेप्टनमध्ये होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं संकटही येऊ शकतं. अशा परिस्थितीत सामना ड्रॉ करावा लगाला किंवा संघामध्ये टाय झाला तर नियम काय असतील? अद्याप तरी या काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. मात्र येत्या दिवसांमध्ये लवकरच ICC प्लेइंग कंडिशन्स जारी करण्याची शक्यता आहे. 


न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया या सामन्यासाठी लवकरच अटी आणि नियम काय असतील याची माहिती ICC जारी करण्याची शक्यता आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Asia Cup 2021 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्रीलंकेत होणार एशिया कप रद्द


टीम इंडिया 


रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के एल राहुल, ऋद्धिमान साहा अशी टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाच्या निवडीदरम्यान  ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान अर्झन नगवासवाला या खेळाडूंना स्टॅडबायसाठी ठेवलं आहे.