BCCI Annual Awards 2024 : बीसीसीआयने 2019 नंतर पहिल्यांदाच 4 वर्षांनी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. बीसीसीआयने याआधी वार्षिक सोहळा 2018-2019 चं आयोजन हे मुंबईत कोरोनाआधी करण्यात आलं होतं. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा पार पडला नाही. अशातच आता यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी भारतीय संघाव्यतिरिक्त इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे सदस्यही उपस्थित होते. गेल्या तीन वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammed Shami) पॉली उम्रीगर अवॉर्ड देऊन बीसीसीआयने सन्मानित केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यरला २०२१-२२ चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार मिळाला. तर स्मृती मानधना हिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. तर मोहम्मद शमीला पॉली उम्रीगर अवॉर्ड (Polly umrigar award) बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटरचा पुरस्कार (2019-20) मिळाला आहे. तर रविचंद्रन आश्विनला 2020-21 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड मिळाला आहे. तर जसप्रीत बुमराहला 2021-22 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड देण्यात आला. तर शुभमन गिलला 2022-23 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड मिळाला.


माधवराव सिंधिया पुरस्कार


भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने 2019-20 हंगामातील रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा माधवराव सिंधिया पुरस्कार जिंकला. त्याला हा पुरस्कार भारताचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विनकडून मिळाला. रियान परागने देशांतर्गत मर्यादित षटकांमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा लाला अमरनाथ पुरस्कार जिंकला आहे.


दरम्यान, मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला माधवराव सिंधिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कोच राहुल द्रविडच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात आला. दिलीप सरदेसाई अवॉर्ड यंदा टेस्टमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याला देण्यात आला आहे. यशस्वीने गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं.