BCCI: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठे बदल केले आहेत. बोर्डाने माजी भारतीय क्रिकेटर ऋषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) यांना महिला क्रिकेट टीमसाठी नवा बॅटींग कोच (Batting coach) म्हणून नियुक्त केलं आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये (T20 series) टीमसोबत जोडणार आहे.


कानिटकर बनले नवे बॅटींग कोच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने हा मोठा बदल भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध होणाऱ्या 5 टी-20 सामन्यांच्या सिरीजपूर्वी केला आहे. कानिटकर या सिरीजपूर्वी टीम इंडियासोबत जोडले जाणार आहेत. 


बीसीसीआसयच्या या मोठ्या निर्णायनंतर कानिटकर म्हणाले, सिनियर महिल क्रिकेट टीमसोबत जोडलं जाणं हे माझ्यासाठी फार सन्मानाची गोष्टी आहे. मला या महिलांच्या टीममध्ये प्रचंड क्षमता दिसून येतेय. आमच्या महिला टीममध्ये युवा खेळाडू आणि अनुभव यांचं चांगलं मिश्रण आहे. तसंच ही टीम येणाऱ्या आव्हानांसाठी तयार आहेय आगामी काळात काही मोठे टूर्नामेंट्स होणार आहेत, त्यामुळे बॅटींग कोच म्हणून माझा प्रवास रंजक असणार आहे.


रमेश पवार जाणार एनसीएमध्ये


दुसरीकडे बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट टीमचे मुख्य कोच रमेश पवार यांना एनसीएला पाठवलं जाणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या या निर्णयावर रमेश पवार म्हणाले, "सिनियर महिला टीमच्या हेड कोच म्हणून माझा अनुभव खूप चांगला होता. गेल्या काही दिवसांमध्ये मी अनेक दिग्गज आणि देशातील युवा खेळाडूंसोबत काम केलं आहे. एनसीएमध्ये माझ्या नव्या भूमिकेसोबत मी माझा अनुभव वाढून इच्छितो."


रमेश पवार हे पहिल्यांदा महिला क्रिकेट टीमचे मुख्य कोच होते. ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या आगामी टी-20 सिरीजपूर्वी बीसीसीआयने मोठा फेरबदल करत पवार यांना एनसीएमध्ये पाठवण्यात आलं आहे.