मोहाली : भारत आणि श्रीलंकेदरम्यान मोहाली टेस्ट सुरू होणार आहे. 4 मार्चपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. हा एक ऐतिहासिक टेस्ट सामना असेल कारण, माजी कर्णधार विराट कोहलीचा हा 100 टेस्ट सामना असणार आहे. दरम्यान या टेस्ट सामन्यापूर्वी बीसीसीआयने विराटच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऐतिहासिक सामन्यासाठी BCCI ने ऐनवेळी एक मोठा बदल केला आहे. पहिल्या टेस्ट सामन्यासाठी मोहालीच्या मैदानावर आता प्रेक्षकांना एंट्री देण्यात आलेली आहे. बीसीसीयाच्या या मोठ्या निर्णयाने विराटच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


बीसीसीआयने यापूर्वी प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी दिली नव्हती. यावरून बोर्डावर अनेक टीका करण्यात आल्या. विराटच्या चाहत्यांकडून सातत्याने यासंबंधी ट्विटवर आवाज उठवल जात होता. अखेरीस 2 दिवसांपूर्वी हा निर्णय बदलून आता या टेस्ट सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे.


काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादाचा बदला म्हणून विराटच्या 100 टेस्टवेळी प्रेक्षकांना परवानगी दिली नसल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं होतं. कारण धर्माशालामध्ये झालेल्या टी-20 मध्ये आणि बंगळूरूमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोहालीमध्ये असं नव्हतं. 


मात्र अखेरीस आता विराटच्या चाहत्यांसमोर बीसीसीआय नरमलंय. यामुळे निर्णयात बदल करून आता 4 मार्चच्या टेस्टसाठी चाहत्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.


पीसीएचे कोषाध्यक्ष आरपी सिंगला यांनी सांगितलं की, "आम्हाला बीसीसीआयकडून मोहालीच्या पहिल्या टेस्ट सामन्यासाठी प्रेक्षकांच्या एन्ट्रीसाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आता आम्ही बुधवारपासून (आजपासून) तिकिटांच्या ऑनलाईन विक्रीला सुरुवात करणार आहोत."