बंगळूरू : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही बातमी अफवा असल्याचं अखेर उघडकीस आलं. सौरव गांगुली कार्डियक चेकअपसाठी बंगळूरूच्या रूग्णालयात दाखल झाल्याची अफवा समोर आली होती. पण ही बातमी खोटी असल्याचं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी गांगुली यांना बेंगळुरूच्या नारायणा हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची अफवा पसरली होती. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की,  गांगुली यांना रूग्णालयात दाखल केलं नसून ते अध्यक्ष डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांना भेटायला गेले होते. 


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली रूग्णालयात दाखल झाल्याची बातमी खोटी आहे. बंगळूरूमध्येच असल्याने गांगुली नारायणा हेल्थचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. 14 फेब्रुवारी रोजी गांगुली या रुग्णालयातील 100 बेड्च्या आधुनिक आयसीयूचे उद्घाटन करणार आहेत."


काही दिवसांपूर्वी हृदयविकारावर उपचारांसाठी गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर गांगुलीला गेल्या वर्षी दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांच्यावर दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या.


क्रिकेट टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.