Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट जगतामध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथे (IPL 2023) आयपीएल सुरु होण्याआधीच (Mumbai Indians) मुंबईच्या संघातून जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं. त्यामागोमागच बीसीसीआयनं (BCCI) पुन्हा एकदा आणखी एका खेळाडूबाबत मोठी अपडेट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Ranji) रणजी विजेत्या मध्यप्रदेशविरोधात 1 ते 5 मार्चदरम्यान खेळल्या जाणाऱ्या (Irani Trophy) इराणी चषकासाठी बीसीसीआयनं रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा केली आहे. यामध्ये एकूण 26 खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. संघाचं नेतृत्त्वं (Mayank Agrawal) मयांक अग्रवालच्या हबाती असेल. पण, एक महत्त्वाची बाब म्हणजे चांगल्या फॉर्ममध्ये असूनही या संघात एका दमदार खेळाडूला जागा मिळालेली नाही. बरीच चर्चा झाल्यानंतर खुद्द बीसीसीआयनंच यामागचं कारणंही स्पष्ट केलं. 


कोणत्या खेळाडूला वगळलं? 


चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही संघात स्थान न मिळालेला हा खेळाडू आहे, सरफराज खान. चांगल्या खेळाचं प्रदर्शन करूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इतकंच नव्हे, तर सरफराज खान (Sarfaraz Khan)ला रेस्ट ऑफ इंडिया संघातही जागा मिळाली नाहीत. ज्यामुळं अनेक क्रिकेटप्रेमींनी बीसीसीआयविरोधात नाराजीचा तीव्र सूर आळवला. अखेर हा रोष पाहून बीसीसीआयकड़ूनच काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. 


हेसुद्धा वाचा : IPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?


 


सरफराजच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे, ज्यामुळं तो निवड प्रक्रियेवेळीसुद्धा उपस्थित नव्हता. ज्यामुळं त्याचा पर्याय म्हणून या मालिकेसाठी बाबा इंद्रजीतची निवड करण्यात आली. एका कॉर्पोरेट टुर्नामेंटमध्ये सरफराजच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला 8 ते 10 दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परिणामी यामुळंच त्याला संघात स्थान मिळवता आलं नाही. 


सरफराज वगळता रेस्ट ऑफ इंडिया संघात कुणाला स्थान? 


सरफरराज खानची हातची संधी हुकलेली असतानाच आता संघात असणारे खेळाडू पुढीलप्रमाणे... मयंक अग्रवाल (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, यशस्वी जायसवाल, यश धुल, बाबा इंद्रजीत, उपेंद्र यादव (उप कर्णधार), अतीत सेठ, सौरभ कुमार, हार्विक देसाई, नवदीप सैनी, मुकेश कुमार, चेतन साकरिया, आकाशदीप, मयंक मार्कंडे, पुलकित नारंग आणि सुदीप कुमार घरामी.