IPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

IPL Mumbai Indians : मुंबई इंडियन्स आणि (Team India) भारतीय क्रिकेट संघासाठी ही अपडेट धोक्याचीच ठरु शकते. कारण, ज्या खेळाडूवर संघातील गोलंदाजीच्या फळीची मोठी जबाबदारी आहे तोच...   

Updated: Feb 27, 2023, 11:56 AM IST
IPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर? title=
IPL 2023 mumbai indians bowler Jasprit bumrah may not be part of team due to injury latest Marathi news

Jasprit Bumrah Injury : आयपीएलच्या नव्या पर्वाची सुरुवात होत नाही, तोच त्यासंबंधीची अनेक वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. अशाच वृत्तांमध्ये एका बातमीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. तर, क्रिकेटप्रेमींच्या जीवाला घोर लागला आहे. कारण, Team India चा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या दुखापतीबद्दलची Latest Update समोर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असणारा बुमराह आता आयपीएलमध्ये खेळणार अशी शक्यता असतानाच यालाही शह देणारी माहिती समोर आली आहे. कारण, त्याच्या खेळण्याची शक्यता धुसर आहे. (IPL 2023) आयपीएलच नव्हे तर, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी (World Championship) जर भारतीय संघ पात्र ठरला. तर, तिथंही बुमराहची दिसण्याची शक्यता कमीच आहे. 

Jasprit Bumrah says he is 'ready to captain India' after Virat Kohli steps  down as Test skipper | Cricket News | Zee News

अपेक्षित वेळेत बुमराह दुखापतीतून न सावरणं सध्या मुंबई आणि भारत अशा दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. मुंबईच्या संघासाठी तर हा मोठा धक्का आहे. सप्टेंबर 2022 पासून बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याचं पाहायला मिळालं आहे. पाठीत असणाऱ्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरून मैदानावर परतण्यासाठी त्याला आणखी बराच वेळ लागू शकतो अशी माहिती क्रिकेट क्षेत्रातील लहानमोठ्या अपडेट्स देणाऱ्या एका अधिकृत संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Ishan Is Missing : क्रिकेटर Ishan Kishan बेपत्ता? 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

 

Right Hand Bowler बुमराह ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 सामन्यात अखेरचा खेळला होता. सध्या तो बंगळुरूमध्ये असणाऱ्या एनसीएमध्ये रिहॅबिलीटेशन प्रक्रियेतून जात आहे. एनसीएमध्येच त्यानं गेल्या 10 दिवसांत काही सराव सामन्यांनाही हजेरी लावली होती. पण, यातून तो पूर्णपणे दुखापतीतून सावरला नसल्याचीच बाब उघड झाली. 

जुलैपासूनच दुखापतीनं त्रास देण्यास सुरुवात केली 

2022 मध्ये जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरोधातील मालिकेमध्येच बुमराहच्या दुखापतीनं डोकं वर काढलं होतं. ज्यानंतर त्यानं ऑस्ट्रेलियाविरोधातील टी20 सामन्यातून पुन्हा क्रिकेटचं मैदान गाठलं होतं. ऑस्ट्रेलियाविरोधात त्यानं पुनरागमन केलं खरं पण, तरीही दुखापतीच्या कारणास्तव एकदिवसीय संघात मात्र त्याला जागा मिळाली नाही.