मुंबई : कोरोना संकटामुळे यंदा आयपीएल 2020 चं आयोजन भारताच्या ऐवजी युएईमध्ये करण्यात आलं होतं. सर्व सामने 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे खेळले गेले. ताज्या माहितीनुसार बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनात मोठा फायदा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युएईमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुमारे 4 हजार कोटींची कमाई केली आहे. यासह टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत 25 टक्के वाढ झाली आहे. या आयपीएलमध्ये 1800 लोकांसाठी सुमारे 20 हजार आरटी-पीसीआर कोविड चाचण्या घेण्यात आल्या. हेच कारण आहे की सर्व 60 सामने कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुबईत 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी ठेवल्यानंतर प्रशिक्षणाला परवानगी दिली. परंतु अबुधाबीमध्ये 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी अनिवार्य होता. याला मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे होम ग्राऊंड बनविण्यात आले. अबुधाबी प्रशासनासोबत बोलून बीसीसीआयने हा कालावधी कमी केला होता.


कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागल्याने बीसीसीआयने आयपीएलचे सामने युएईमध्ये खेळवले. प्रेक्षकांविना हे सर्व सामने खेळवले गेले. तरी देखील बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनातून चांगली कामाई केली आहे.