मुंबई : टीम इंडियाने टी 20 सीरिजमध्ये क्लीन स्वीप करत श्रीलंकेला पराभूत केलं. आता कसोटी सीरिज सुरू आहे. कदाचित ही सीरिज टीम इंडियातील ज्येष्ठ खेळाडूसाठी शेवटची ठरू शकते. श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 222 धावांनी दणदणीत विजय पहिल्याच इनिंगमध्ये मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजनंतर एक क्रिकेटर संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रोहितने नव्या खेळाडूंना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. त्याच सोबत काही खेळाडूंना मात्र डावललं आहे. निवड समितीनं काही क्रिकेटर्सना संधी दिली नाही. 


टीम इंडियामधून सध्या बाहेर असलेला खेळाडू सध्या रणजीमध्ये देखील चांगली कामगिरी करताना दिसत नाही. त्यामुळे चाहते देखील खूप नाराज आहेत. 


श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला अनुभवी खेळाडूंना कमी संधी देण्यात आली. यामध्ये इशांत शर्माचं नाव नव्हतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही इशांतला संघात संधी देण्यात आली नव्हती. 


33 वर्षीय इशानची कारकीर्द हळूहळू संन्यास घेण्याच्या दिशेनं जात आहे का असा आता प्रश्न उद्भवू लागला आहे. इशांत ही निवड समितीची पहिली पसंती नसल्यानं आता संघात संधीही फार कमी मिळत आहे. तर उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरचे चांगले दिवस आले आहेत. 


अशा स्थितीत इशांत शर्मा सतत संघाबाहेर राहिल्यामुळे निवृत्ती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ही फक्त चर्चा आहे याबाबत इशांत शर्माने अद्याप कोणतंही वक्तव्य केलं नाही. मात्र खरंच श्रीलंका सीरिज संपल्यावर इशांत संन्यास घेण्यावर काही बोलणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


बुमराह आणि शमी यांची जोडी सध्या सुपरहिट आहे. याशिवाय अश्विन आणि जडेजासारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे सध्या इशांतला निवड समिती विशेष भाव देत नसल्याचं दिसत आहे. तर शार्दूल ठाकूर आणि उमेश यादवलाही संघात पुन्हा संधी दिली जात आहे.