Asia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!
Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.
PCB Chief Najam Seth: वर्ल्ड कपमध्ये (World Cup) दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) गेल्या महिन्यात अनेक प्रशासकीय बदल केले आहेत. रमीझ राजा (Rameez Raja) यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि व्यवस्थापकीय समितीमध्ये नवनियुक्ती करण्यात आली. पीसीबीचे चीफ म्हणून नजम सेठी (PCB Chief Najam Seth) यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली. तर माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीची देखील पुरुष वरिष्ठ संघाचा अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आलं. अशातच आता बीसीसीआयचे सचिव जय शहा (BCCI Secretary Jay Shah) यांच्या ट्विटमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) पोटदुखी सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. (bcci jay shah released media statement in response to pcb najam sethi marathi news)
जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे. त्यांनी जय शहा यांच्या ट्विटला (Jay Shah Tweet) रिट्विट करत जय शहा यांना कोपरखळी मारली.
काय म्हणाले नजम सेठी?
एसीसीची नवीन रचना आणि कॅलेंडर 2023-24 एकतर्फीपणे जारी केल्याबद्दल जय शहा यांचे आभार, विशेषत: जेव्हा पाकिस्तानकडे आशिया कप 2023 चं (Asia Cup) यजमानपद आहे. जेव्हा सर्वकाही तुम्ही स्वतःहून ठरवताय... तेव्हा तुम्ही आमच्या PSL 2023 कॅलेंडर देखील जारी करू शकता. तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, असं नजम सेठी म्हणाले. त्यावर जय शहा (Jay Shah) यांनी उत्तर दिलंय.
आणखी वाचा - Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!
दरम्यान, पीसीबीसह इतर सदस्य देशांना 22 डिसेंबर 2022 रोजी वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली होती, परंतु पीसीबीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं एसीसीकडून (Asian Cricket Council) सांगण्यात आलंय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर पडल्याचं पहायला मिळतंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर पाकिस्तान पुढील वर्षी भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) खेळणार नाही, असं रमीझ राजा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता नजम सेठी देखील पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत.