विराटला नोकरीचा राजीनामा देण्याचा बीसीसीआयचा आदेश
टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. गॉल स्टेडियमवर पहिल्या कसोटीत सामन्यात भारतीय चांगली खेळते आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक ठोकत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. पण त्याआधी विराटला एक मोठा धक्का बीसीसीआयने दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक नवीन फर्मान जारी केले आहे. ज्यामुळे कोहलीला त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
मुंबई : टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. गॉल स्टेडियमवर पहिल्या कसोटीत सामन्यात भारतीय चांगली खेळते आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक ठोकत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. पण त्याआधी विराटला एक मोठा धक्का बीसीसीआयने दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक नवीन फर्मान जारी केले आहे. ज्यामुळे कोहलीला त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
या नवीन आदेशानुसार आता विराट कोहलीला नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बीसीसीआयने विराट आणि इतर खेळाडूंना नोकऱ्यांचा राजीनामा देण्यास सांगितलं आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ओएनजीसी व्यवस्थापक म्हणून नियुक्त आहे. विराट कोहली अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये ओएनजीसी वतीने देखील खेळला आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये नोकरी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.
बोर्ड आता खेळाडूंसोबत नवा करार तयार करत आहे आणि त्याच्या अंतर्गत ही सूचना देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासन समिती मंडळाने (COA)ने स्पष्ट केलं आहे की, सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही कंपन्यांमध्ये विशिष्ट पदावर खेळाडू नाही राहू शकत.