मुंबई: आपल्या तुफान फलंदाजीनं मैदान गाजवणाऱ्या दादाने प्रेमातही मोठी बाजी मारली आहे. तुफान फलंदाज, कर्णाधार आणि आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना बालपणापासून साथ देणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीच्या प्रेमात गांगुली अखंड बुडाले. मैदानातील फलंदाजी एवढेच प्रेमाच्या पिचवर त्यांनी विजय मिळवला. त्यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात त्यावेळी लाखो दिलों की धडकन असणाऱ्या सौरव गांगुलीचं मन मात्र त्याच्या मैत्रिणीत गुंतलं होतं. डोना आणि सौरव गांगुली एकमेकांशेजारीच राहात होते. दोन्ही कुटुंबाचे एकमेकांसोबत चांगले संबंध होते. डोना आणि गांगुली यांची खूप चांगली मैत्री होती. हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 


दोघांमध्ये प्रेम वाढत गेलं आणि अखेर गांगुली यांनी 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी डोनाला लग्नासाठी प्रपोज केलं. प्रत्येकापासून लपून दोघांनी 12 ऑगस्ट 1996 रोजी लग्न केले. लग्नानंतर सौरव गांगुली श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेले होते. परंतु काही दिवसातच या दोघांचे लग्न घरातील सदस्यांसमोर उघड झाले. त्यानंतर सौरवच्या घरातील सदस्यांना डोनाला त्यांच्या घराची सून म्हणून स्वीकारावे लागलं. दोघांच्या कुटुंबियांचं त्यांच्या प्रेमापुढे काहीच चाललं नाही.


21 फेब्रुवारी 1997 सौरव आणि डोना यांनी पारंपरिक पद्धतीनं सर्वांच्या साक्षीनं लग्न केलं. आज दोघंही परफेक्ट कपलसारखे आहेत. क्रीडा विश्वात आज त्यांचाकडे बेस्ट कपल म्हणून पाहिलं जातं. 2001मध्ये या दोघांना एक गोंडस मुलगी देखील झाली होती. 1996मध्ये गांगुली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात केली होती.