कोलकाता : BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोना झाल्याचे पुढे आल्यानंतर सौरवने स्वतःची देखील कोरोना चाचणी केली. त्याच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. भावाला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच सौरवने स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आणि खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी केली. परंतु गांगुलीला करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांच्यावर सध्या महानगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तर गांगुली घरातूनच बीसीसीआयचा सर्व कारभार करत आहे.


दरम्यान कोरोना  महामारीच्या काळात गांगुली व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठका घेत आहे. कालच बीसीसीआयने आयपीएलची अधिकृत घोषणा केली होती. IPL च्या अध्यक्षपदी असणाऱ्या ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. १९ सप्टेंबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत UAE येथे हे सामने पार पडणार आहेत. 


दरम्यान, आयपीएलचे सामने पार पडणार असले तरीही यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप मात्र पुढे ढकलण्यात आला आहे.