मुंबई :  आयपीएल सामन्यानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. या सामन्यात भारतीय संघ दोन कोचसह मैदानात उतरणार आहे. सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याच्यासोबत आता आणखीण एका दिग्गज खेळाडूला भारतीच संघाचा कोच बनवला जाणार आहे. बीसीसीआयचे हे नवीन एक्सपेरीमेंट करण्या मागचं कारण अद्याप कळू शकले नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs SA) यांच्यात 9 जून ते 19 जून दरम्यान 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. नेशनल क्रिकेट अॅकेडमीचा व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS Laxman) भारतात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे वृत्त आहे.


टीम इंडियाला (Team India) 26 जून ते 28 जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड 15 किंवा 16 जून रोजी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतात. टीम इंडिया 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.


इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'राहुल द्रविड १५ किंवा १६ जून रोजी भारतीय संघासोबत यूके दौऱ्यासाठी रवाना होईल. याशिवाय बोर्ड व्हीव्हीएस लक्ष्मणला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून सामील करण्याची शक्यता आहे.  


शिखर धवनला कर्णधारपद 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते आणि शिखर धवनकडे (Shikhar Dhawan)  युवा संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत निवड समिती युवा खेळाडूंना अधिक संधी देणार आहे.  केएल राहुल, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे खेळाडू टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत वरिष्ठ संघाचा भाग असतील.