मुंबई: सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याचा दुसरा दिवस आहे. न्यूझीलंड विरुद्घ सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचं आहे. मात्र जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आहे. हा धोका वाढला आहे. त्यामुळे हा दौरा होणार की नाही याची धाकधूक असतानाच आता एक मोठी माहिती येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका होणार की नाही याबाबत बीसीसीआई एजीएम बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी बोर्डने या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला आहे. न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होईल. 


जुन्या शेड्युलनुसार 7 आठवड्यामध्ये 3 कसोटी, 3 वन डे आणि 4 टी 20 सामने होणार होते. मात्र या शेड्युलमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यामधील शेड्युलमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या शेड्युलनुसार टी 20 मालिका खेळवली जाणार नाही. तर 3 कसोटी आणि 3 वन डे सामने खेळवण्यात येतील अशी माहिती जय शाह यांनी दिली आहे. 


टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही क्वारंटाइनमधून जावं लागणार आहे. नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता काही कठोर नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे जुन्या शेड्युलमध्ये बदल करावा लागल्य़ाची माहिती मिळाली आहे. आता BCCI च्या या निर्णयाला क्रीडा मंत्री आणि सरकारकडून परवानगी मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.