BCCI मालामाल : ICC ने रेव्हेन्यू शेअर वाढवला, आता वर्षाला मिळतील `इतके` अब्ज
ICC-BCCI : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये. इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये.
ICC-BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआय ( bcci ) आता मालामाल होणार आहे. यामागचं कारण आहे ते म्हणजे, आयसीसीकडून येणारा फंड. इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये. ही वाढ थोडी-थोडकी नसून तब्बल 72 टक्क्यांची असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पत्र लिहून याबाबत माहिती दिलीये.
सध्या आयसीसीच्या वार्षिक परिषद सुरु असून या परिषदेसाठी सचिव जय शहा डर्बनमध्ये आहेत. यावेळीच आयसीसीने रेवेन्यू शेयरची नवीन यादी जाहीर केली. शिवाय याचवेळी त्यांच्या बोर्ड मेंबर्सना देखील ही यादी देण्यात आली आहे.
बीसीसीआयला किती टक्के शेअर मिळणार
आयसीसीच्या रेवेन्यू मॉडलनुसार, आता बीसीसीआयला 2024-27 सिझनमध्ये आयसीसीच्या कमाईतून 38.5 टक्के वाटा मिळणार आहे. बीसीसीआयला यापूर्वी आयसीसीकडून 22.4 टक्के वाटा मिळत होता. मात्र यामध्ये आता सुमारे 72 टक्के वाढ झालीये.
बीसीसीआयला मिळालेली ही वाढ भरमसाठ असून आता क्रिकेट बोर्ड मालामाल होणार आहे. बीसीसीआयच्या स्टॉकमध्ये ही प्रचंड वाढ आहे. यावेळी जय शहांनी आपल्या पत्रात नमूद केलंय की, सर्व राज्य क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे परिणाम आहेत.
बीसीसीआयला किती पैसे मिळणार?
बीसीसीआयला मिळणारा 38.5 टक्के महसूल वाटा म्हणजे 2024-24 सिझनमध्ये मंडळाला $230 दशलक्ष म्हणजेच वार्षिक सुमारे 2000 कोटी रुपये मिळणार आहे. ICC ची वार्षिक कमाई $600 दशलक्ष म्हणजे सुमारे 5000 कोटी रुपये आहे.
ICC ने भारतीय ब्रॉडकास्टर 'Disney + Hotstar' सोबत सामन्यांसाठी केलेल्या कराराला BCCI च्या स्टॉकमध्ये एवढ्या वाढीचं श्रेय जातंय. नवीन करारानुसार, डिस्ने स्टारने 3.1 अब्ज डॉलर्सची ऑफर देऊन पुढील चार वर्षांसाठी त्याच्या सामन्याचे प्रसारण हक्क ICC कडून विकत घेतलेत.
जय शाह यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलंय की, हा निधी खेळाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि पुढील मीडिया हक्क चक्रात क्रिकेटच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यास मदत करणार आहे. शिवाय स्ट्रॅटेजिक फंडाला चालना देऊन या फंडाचा वापर महिला क्रिकेटच्या विकासासाठी केला जाणार आहे.