मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग चार मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाला दोन मॅच गमवाव्याही लागल्या. परंतु, पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळीनं न्यूझीलंडला नमवून टीम इंडिया सेमीफायनलमध्ये दाखल झाली. यानंतर सेमीफायनल मॅचमध्येही सहा वेळा वर्ल्डकप चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत आता भारताना फायनलमध्ये धडक मारलीय. याच शानदार आणि दमदार खेळीसाठी महिला खेळाडुंनाही बक्षिसं देण्यात येतील, असं बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी के खन्ना यांनी स्पष्ट केलंय. 


'BCCI कडून महिला क्रिकेट टीमला वर्ल्डकपच्या शानदार प्रदर्शनासाठी बक्षीसं देण्यात येतील' असं खन्ना यांनी म्हटलंय. 


वर्ल्डकपच्या फायनलमध्ये २३ जुलै रोजी भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यान लॉर्डस मैदानावर सामना रंगणार आहे. भारतीय महिला खेळाडुंकडूनही क्रिकेटप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत, हे नक्की.