मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाची आजपासून सुरुवात होणार आहे. आज चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना होणार आहे. या सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तर एकीकडे IPLवर कोरोनाचं संकट अधिक गडद होत असताना BCCIने मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या कोरोनामुळे BCCIने प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी बंदी आणली आहे. यंदाचे सामने प्रेक्षकांविनाच पार पडणार आहेत. इतकच नाही तर मीडियाला देखील मैदानात उतरुन वार्ताकन करण्याची परवानगी नाकरण्यात आली आहे. खेळाडूंच्या सुरक्षिच्या दृष्टीनं काही नियम कठोर करण्यात आले आहेत. 


यावर्षी देखील कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रेक्षकांना सामने पाहता येणार नाहीत. मात्र, शुक्रवारी नव्याने स्थापन झालेल्या दिव्यांग क्रिकेट काऊन्सिलच्या (डीडीसीआय) अधिकाऱ्यांना पहिला सामना पाहण्याची विशेष परवानगी BCCIकडून देण्यात आली आहे. 


डीसीसीआयनं एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर्षी दिव्यांग क्रिकेट काउन्सिलचे सदस्य पहिल्यांदा आयपीएलचा उद्घाटन सोहळा पाहणार आहेत. त्यांना पहिला सामना देखील पाहण्याची संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी डीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आम्ही बीसीसीआयच्या कार्यक्रमात प्रथमच सहभागी होणार आहोत.


जगातील सर्वात मोठ्या टी -20 स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केल्यानं अधिकाऱ्यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत. या समारंभात केवळ 5 सदस्य सहभागी होणार आहेत. ज्यांना हा सोहळा पाहता येईल. 


देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकीकडे ग्राऊंड स्टाफ आणि ब्रॉडकास्टींग टीममधील लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. तर खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी विनाप्रेक्षक सामने होणार आहेत.