मुंबई : टीम इंडियामधील एक असा क्रिकेटर आहे, ज्याने टीममध्ये येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कापला खेळ देखवला.  परंतु असे असुनही निवडकर्त्यांनी मात्र या खेळाडूकडे लक्ष न देता त्याला टीम इंडियापासून लांब केलं आहे. सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यामुळे त्यांची मते लक्षात घेऊन निवड समिती खेळाडूंची निवड करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु रोहीच्या कारकिर्दीत इंडियन टीमच्या एका खेळाडूवरती मात्र अन्याय झाला आहे. कारण या खेळाडूला टीमपासून लांब राहावे लागत असल्यामुळे लवकरच त्याचे करिअर धोक्यात आहेत.


मलिंगा-बुमराहसारखाच धोकादायक आहे टीम इंडियाचा हा गोलंदाज 


टीम इंडियाचा 'यॉर्कर मॅन' म्हणून ओळखले जाणारा टी नटराजन (T Natarajan) जवळपास वर्षभरापासून टीम इंडियातून बाहेर आहे. हा गोलंदाज श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासारखे प्राणघातक यॉर्कर चेंडू टाकतो, ज्यामुळे टीमला विरोधी संघातील मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळते.



परंतु निवडकर्त्यांनी या खेळाडूला टीम इंडियातून बाहेर ठेवले आहे. टी. नटराजन शेवटचा मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसला होता. या मालिकेनंतर टी. नटराजनला निवड समितीने विचारात घेतलं नाही.


बराच वेळ संधी नाही


टी. नटराजन यांनी भारतासाठी 1 कसोटी सामना, 4 T20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 2 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच टी. नटराजनने कसोटीत 3, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट आणि एकदिवसीय सामन्यात 3 बळी घेतले आहेत. आयपीएल 2020 मध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या गोलंदाजाला टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.


नटराजनने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आतापर्यंत डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. यासोबतच एकामागून एक यॉर्कर चेंडूने जगातील सर्वोत्तम फलंदाजांना त्रास दिला आहे. अशा स्थितीत त्यांच्यासाठी अधिकाधिक कलागुण दाखविण्याची मोठी संधी आहे. जे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मकही आहे.


परंतु आता निवडकर्ते त्याला का टीममध्ये घेत नाहीत, त्याच्याबद्दल काय विचार करत आहेत हे कोणालाही माहिती नाही.


डावखुरा यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजनने आपल्या यशाचे श्रेय टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला दिले आहे. नटराजन सांगतो की, एकदा आयपीएलमध्ये धोनीने त्याला स्लो बॉलर आणि कटर टाकण्याचा सल्ला दिला होता. धोनीने त्याचे कौशल्य सुधारण्यासाठी त्याला खूप मदत केली. ज्यामुळे तो अशी गोलंदाजी करु शकला आहे, असे देखील त्याने सांगितले.