नवी दिल्ली : भारताचा कर्णधार सध्या सुपर फॉर्मात आहे. साऊथ आफ्रिका दौऱ्यावरही त्याच्या बॅटमधून रन्स निघत राहिले. पण कोहलीच्या डोक्यात २०१३ सालच्या इंग्लड दौऱ्याच्या कटू आठवणी आहेत. तेव्हा १० टेस्टमध्ये त्याने १३.४० च्या सरासरीने केवळ १३४ रन्स बनविले होते.


आयपीएलनंतर दौरा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडसोबत मोठी सिरीज खेळण्यास रवाना होईल. इंग्लंडच्या धर्तीवर आपल्या कटू आठवणी विसरून आपल्या बॅटमधून मोठी धावसंख्या उभारण्यास तो सज्ज आहे. आयपीएल संपल्यानंतर कोहली लगेचच इंग्लंड दौऱ्याआधी काऊंटी क्रिकेटसाठी रवाना होणार आहे. दौऱ्याआधी तिथली विकेट, हवामान आणि वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी हा निर्णय घेतलाय. 


१४ जूनपासून भारतीय टीम बंगळूरूमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टेस्ट मॅच खेळेल. अफगाणिस्तानच्या इतिहासातील ही पहिली टेस्ट असेल पण विराट कोहली यामध्ये सहभागी होणार नाही.