india vs afghanistan : आशिया चषक 2022 (asia cup 2022) स्पर्धेमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान (india vs afghanistan) यांच्यातील सुपर 4 स्टेजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) होणार आहे. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या एंट्री गेटजवळील एका इमारतीला आग (fire broke out near Dubai Stadium) लागल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी ही घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग स्टेडियमच्या एंट्री गेटजवळील एका इमारतीत लागली, ज्याचा धूर संपूर्ण स्टेडियमभोवती दिसू लागला.



दीपक चहरचा संघात समावेश


दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध  होणाऱ्या सुपर फोर सामन्यापूर्वी, वेगवान गोलंदाज दीपक चहरचा आवेश खानच्या जागी भारताच्या आशिया कप संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, आवेश आजारपणाच्या तक्रारीमुळे रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या सुपर फोर सामन्यातून बाहेर पडला होता. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना स्पर्धेच्या नंतरच्या सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल अशी अपेक्षा होती. आवेशने भारताचा श्रीलंकेविरुद्धचा सुपर फोर सामनाही गमावला.