वन डे सिरीजआधी धोनीचा नवा लूक समोर
धोनी हेअर स्टाईलवर वेळोवेळी एक्सपिरीमेंट करत असतो. २०११ मध्ये मिळालेल्या यशानंतर धोनीने केस कापले होते. आता धोनीची नवी हेअर स्टाईल समोर आली आहे.
मुंबई : मैदानामध्ये आपल्या खेळाचा जलवा दाखविणारे खेळाडू आपल्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत असतात. खेळाडू दरवेळी नवनवी हेअर स्टाईल करत राहतात.
फुटबॉल खेळाडू तर हेअर स्टाईल वरून ओळखले जातात. पण इंडियन क्रिकेटर्सच्या हेअर स्टाईलही फॉलो केल्या जात आहेत.
हेअर स्टाईलिश प्लेअर्स
सध्या टीम इंडियामधले विराट कोहली, हार्दिक पांड्या, के.एल.राहूल आणि रवींद्र जडेजा प्रत्येक वेळी नवनवीन हेअर स्टाईल ठेवत असतात.
धोनी चर्चेत
पण या क्रिकेटर्सच्याआधी महेंद्रसिंग धोनी हेअर स्टाईलमूळे चर्चेत होता. करिअरच्या सुरूवातीला धोनीची लांब केसांची स्टाईल खूप चर्चेत राहिली. पाकच्या दोऱ्यावर असताना परवेज मुशरफ यांनी देखील धोनीच्या हेअर स्टाईलची तारीफ केली होती.
जाहिरातीसाठी हेअरकट
धोनी हेअर स्टाईलवर वेळोवेळी एक्सपिरीमेंट करत असतो. २०११ मध्ये मिळालेल्या यशानंतर धोनीने केस कापले होते. आता धोनीची नवी हेअर स्टाईल समोर आली आहे. एका जाहिरातीसाठी धोनीने हा हेअरकट केला आहे.
नव्या लूकसह मैदानात
सध्या टीम इंडिया श्रीलंकेसोबत मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर वनडे आणि टी २० असणार आहे. यासाठी धोनीदेखील नव्या हेअर स्टाईलसह मैदानात उतरलेला दिसेल.