Ind vs Pak : कोलंबोच्या मैदानावर रविवारी दुपारी 3 वाजता आज भारत विरूद्ध पाकिस्तान ( India Vs pakistan ) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. 2 सप्टेंबर रोजीही भारत-पाकिस्तान आमने-सामने आली होती. मात्र त्यावेळी पावसाने या सामन्यात खेळ करत तो रद्द केला. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकिस्तान टीमचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ( Shaheen Afridi ) एक वक्तव्य केलंय. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला उद्देशून एक सांगितलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 सप्टेंबर रोजी झालेल्या एशिया कप 2023 च्या सामन्यात भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) भारतीय फलंदाजांना चांगलंच नाचवलं. आज होणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाचे फलंदाज आणि शाहीन आफ्रिदी यांचा सामना होणार आहे. मात्र त्याने सामन्यापूर्वी केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहते हैराण झाले आहेत.  


Shaheen Afridi चं सामन्यापूर्वी मोठं वक्तव्य


नुकतंच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचा खेळाडू शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Afridi) टीम इंडियाच्या ओपनर्सना आऊट करण्यासंदर्भात वक्तव्य केलं. शाहीन म्हणाला, माझा प्रयत्न असेल की, ओपनर्स खेळाडू लवकर आऊट होतील. तसा माझा प्लान तर सर्वांनाच माहितीये. 


रोहित आणि गिल करणार ओपनिंग


एशिया कपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात हा दुसरा सामना रंगणार आहे. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हे पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यासाठी ओपनर असणार आहे. हे दोन्ही फलंदाज पहिल्या 10 ओव्हर्समध्ये उत्तम फलंदाजी करतील, अशी अपेक्षा केली जातेय. 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या ओपनिंर जोडीला साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा (11) आणि शुभमन गिल (10) स्वस्तात माघारी परतले होते. 


टीम इंडियाच्या फलंदाजांना शाहीन आफ्रिदी देणार टक्कर


आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) आशिया कप 2023 मध्ये फलंदाजांवर कहर केलाय. सध्या शाहीनने 3 सामन्यात गोलंदाजी केली असून त्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी भारतविरूद्ध झालेल्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने 4 विकेट्स घेतल्या होता. यावेळी प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्याने माघारी घाडलं होतं. 


संभाव्य भारतीय संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.