Ind vs Zim : टी-20 विश्वचषकामझध्ये सुपर 4 मधील दोन संघ ठरले असून आता ग्रुप 1 मधील दोन संघ राहिले आहेत. उद्या साऊथ आफ्रिका वि. नेदरलँड आणि भारत वि. झिम्बाब्वे यांच्यात लढत होणार आहे. (T-20 World Cup 2022) भारताला या सामन्यामध्ये विजय मिळवणं गरजेचंच आहे. नाहीतर पाकिस्तानने बांगलादेशविरोधात विजय मिळवला तर भारत स्पर्धेच्या बाहेर फेकला जाऊ शकतो. अशातच या सामन्याआधी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर. आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे. (R. Ashwins big statement Before against Zimbabwe Match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रविचंद्रन अश्विन म्हणाला, 'टी-20 विश्वचषकातील इतर स्पर्धेप्रमाणेच या टी-20 विश्वचषकातही हा सामना जिंकणारा आहे. आम्ही खेळासाठी उत्सुक आहोत. झिम्बाब्वेने उत्तम क्रिकेट खेळले आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली केली, त्यामुळे आम्ही त्याचा आदर करतो. तो सहजासहजी हार मानणार नाही. 


आम्ही इथपर्यंत सहज पोहोचलो नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध काही कठीण सामने खेळले आहेत जे शेवटपर्यंत गेले आहेत. मला वाटतं जे मॅच पाहतात आणि तज्ञ मत देतात ते अजूनही शिकत आहेत कारण सामना काही षटकांवरून सामन्यांचा निकाल ठरतो, असंही रविचंद्रन अश्विन म्हणाला. यावेळी बोलताना आश्विनने मंकडिंगवरही भाष्य केलं आहे.


दरम्यान, हामंकडिंग कायदेशीर आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जेव्हा असं घडतं तेव्हा टीका करणारे लोक पुढे येतात, असंही आश्विन म्हणाला. उद्याचा सामना भारतासाठी करो या मरो असणार आहे. भारताला विजय मिळवणं गरजेचं आहे.