मेलबर्न : T20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून यंदाचा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जातोय. यासाठी टीम इंडियाने पूर्ण तयारी केली असून पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यावर चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही टीम सुपर-12 फेरीतील आपल्या मोहिमेची सुरुवात या सामन्याने करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली असून आयसीसीने खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हीडिओममध्ये कॉमेडियन दानिश सैत त्याच्या मजेदार शैलीमध्ये खेळाडूंना प्रश्न विचारत मजामस्ती करताना दिसतोय.


ICC ने व्हिडिओ केला शेअर


कॉमेडियन दानिश सैतने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या क्रिकेटपटूंसोबत मजा केली. यावेळी त्याने खेळाडूंना मजेशीर प्रश्न विचारलेत. दरम्यान खेळाडूंनीही त्याला त्याच शैलीत उत्तर दिलं आहे. यामध्ये दानिशने रविचंद्रन अश्विनला विचारलं की, तू ऑस्ट्रेलियाला टुरिस्ट व्हिसावर आला आहेस की वर्क व्हिसावर. यावर अश्विनने कोणतंही उत्तर दिलं नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Danish sait (@danishsait)


यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला 'ऑफ-स्टंपच्या बाहेरचा' प्रश्न विचारला, ज्याचं उत्तरही त्याच पद्धतीने मिळालं. यामध्ये केवळ सूर्यकुमार यादवने मात्र दानिशसोबत मस्ती केलीये. हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून त्यांनी भरभरून त्याला लाईक्स दिले आहेत.


विराटला नेमका काय प्रश्न केला?


यादरम्यान दानिशने विराट कोहलीला विचारलं की, जर त्याने त्याला ऑफ स्टंपबाहेर प्रश्न विचारला तर तो त्या प्रश्नाला उत्तर देणार का? हे ऐकून कोहलीने पहिल्यांना वैतागून दानिशकडे पाहिलं आणि त्यानंतर तो त्याच्यापासून दूर गेला. 


डॅनिश सैत त्याच्या खास शैलीसाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) टीमसोबत व्हिडिओही बनवले आहेत.