इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला अटक
इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
ब्रिस्टल : इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी पोलिसांनी अटक करण्यात आली होती. ब्रिस्टलच्या बारमध्ये घडलेल्या एका घटनेमध्ये स्टोक्सच्या हातालाही दुखापत झाली आहे. यावेळी बारमध्ये स्टोक्सबरोबर अॅलेक्स हेल्सही उपस्थित होता. या घटनेनंतर स्टोक्स आणि हेल्सला वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
ब्रिस्टलमध्ये झालेल्या एका घटनेमुळे स्टोक्सला अटक करण्यात आली होती. याबाबतची माहिती योग्यवेळी देऊ, अशी प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेट बोर्डानं दिली आहे. सोमवारी रात्री स्टोक्सला अटक केल्यानंतर त्याला रात्रभर तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर सोमवारी उशीरा त्याला सोडून देण्यात आलं.