लग्नाच्या दोन दिवसआधी या क्रिकेटरला लागला मोठा झटका
इंग्लंड क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर क्रिकेटर असलेल्या बेन स्टोक्स याचा १४ ऑक्टोबर रोजी विवाहसोहळा आहे. मात्र, लग्नापूर्वी बेन स्टोक्सला एक जोरदार झटका लागला आहे.
नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर क्रिकेटर असलेल्या बेन स्टोक्स याचा १४ ऑक्टोबर रोजी विवाहसोहळा आहे. मात्र, लग्नापूर्वी बेन स्टोक्सला एक जोरदार झटका लागला आहे.
नाईट क्बलमध्ये एका व्यक्तीसोबत मारहाण केल्याप्रकरणी इंग्लंडचा क्रिकेटर बेन स्टोक्स याच्या अडचणी काही कमी होत नाहीयेत. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत अॅशेस सीरिजमधून बेन स्टोक्सला बाहेर ठेवलं आहे तर आता त्याला आणखीन एक झटका लागला आहे.
स्पोर्ट्स प्रोडक्टची मोठी कंपनी असलेल्या न्यू बँलेंसने बेन स्टोक्सच्या या कृत्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट तोडलं आहे. इंग्लंडमधील वृत्तपत्र द गार्डियन्सने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू बँलेंसने एक पत्रक काढत म्हटलं आहे की "न्यू बँलेंस आपल्या ग्लोबल अॅथलिटच्या अशा कुठल्याही व्यवहाराचं समर्थन करत नाही जे आमच्या ब्रँडची संस्कृती आणि विचारांशी वेगळं आहे. आम्ही ११ ऑक्टोबर २०१७ पासून बेन स्टोक्ससोबत असलेला कॉन्ट्रॅक्ट संपवत आहोत."
बेन स्टोक्सला ब्रिस्टलमध्ये एका नाईट क्लबच्या बाहेर २७ वर्षीय व्यक्तीला मारहाण करताना पाहिलं गेलं होतं. या प्रकरणानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी चौकशी होईपर्यंत स्टोक्सला टीममधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस सीरिजची पहिली मॅच २३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या मॅचपूर्वी जर चौकशीत स्टोक्स निर्दोष ठरला तरीही त्याला टीममध्ये सहभागी होता येणार नाहीये.