बेन स्टोक्सची `सुपरमॅन` फिल्डिंग, हवेत उडी मारत अडवला SIX, जगभर व्हायरल होतोय Video!
England vs Australia : सॅम करनच्या पहिल्याच चेंडूवर मार्शने एक षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण स्टोक्सने (Ben Stokes) हवेत झेप घेत जे केलं, त्याने तुमचे डोळे देखील उघडेच राहतील...
Ben Stokes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये (England vs Australia) टी-ट्वेंटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना (Australia vs England, 2nd T20I) ओवल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 179 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंकडून जबराट फिल्डिंग पहायला मिळाली. खासकरून इंग्लंडचा धाकड फलंदाज बेन स्टोक्स (Ben Stokes) याची... ऑस्ट्रेलिया संघाचं 12 वं षटक सुरू असताना बेन स्टोक्सने कमाल केली. त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Ben Stokes fielding Video) होताना दिसतोय. त्याचबरोबर जगभरातून स्टोक्सचं कौतूक देखील होत आहे.
टी-ट्वेंटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात सॅम करन (Sam Karan) ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12 वं षटक टाकत होता आणि त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श (Michel Marsh) स्ट्राइकवर होता. सॅम करनच्या पहिल्याच चेंडूवर मार्शने एक षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण स्टोक्सने (Ben Stokes) हवेत झेप घेत जे केलं, त्याने तुमचे डोळे देखील उघडेच राहतील.
ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 10 च्या रन रेटने आक्रमक खेळी करण्याची गरज होती. त्यावेळी सॅम करन आणि मॅर्श मैदानात होते. 12 व्या षटकातील सॅम करनच्या एका चेंडूवर मिचेल मार्श जोरात फटका मारला.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, बॉल बॉन्ड्रीलाईनकडे जात असताना बेन स्टोक्सने (Ben Stokes superman catch) झेप सुपरमॅन झेप घेत बॉल एका हाताने अडवला आणि चेंडू पुन्हा बॉन्ड्रीलाईनच्या आत फेकला. त्यामुळे सिक्स गेला नाही. बेन स्टोक्सच्या मारूती झेपेमुळे इंग्लंडला 4 धावा वाचवता आल्या आहेत. स्टोक्सच्या या कॅचचं जगभरातून कौतूक होताना दिसतंय. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून अनेकांनी व्हिडीओवर भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत.