सिडनी : भारताचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतचे फॅन आता वाढू लागले आहेत. सिडनी टेस्टमध्ये त्याने शतक ठोकत आपलं महत्त्व दाखवून दिलं आहे. शतक ठोकण्याआधी भारत आर्मीने पंतसाठी स्टेडिअममध्ये गाणं गायलं. टिम पेनला या गाण्यातून टार्गेट करण्यात आलं. टिम पेनने पंतला बेबीसिट करण्याचं सांगून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारत आर्मीने हे गाणं तयार केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचा युवा विकेटकीपर पंतने शतक ठोकल्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. पंतच्या या धमाकेदार खेळीनंतर आता धोनीसोबत त्याची तुलना होऊ लागली आहे. धोनीने टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियात एकही शतक झळकावलेलं नाही. पण पंतने विकेटकीपर म्हणून आतापर्यंत २ शतक ठोकले.



दुसरीकडे चेतेश्वर पुजारा दुहेरी शतक पासून थोडक्यात चुकला. पुजारा १९३ रनवर आऊट झाला. भारताने ६२२ रनवर डाव घोषित केला. यासाठी भारताने ७ विकेट गमावल्या. भारताकडून मयंक अग्रवालने ७७, लोकेश राहुल ९, पुजारा १९३, कोहली २३, रहाणे १८, हनुमा विहारी ४२, पंत १५९ आणि जडेजाने ८१ रन केले.