नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमार अलीकडेच नूपुर नागरसोबत विवाहबद्ध झाला. लग्नाचे रिसेप्शन दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये झाले. याला भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंनी उपस्थिती लावली.


या लावली खेळाडूंनी उपस्थिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, मुरली विजय, शिखर धवन, इशांत शर्मा, रवि शास्त्री, सुनील गावस्कर आणि आशीष नेहरा यांनी रिसेप्शनला हजेरी लावली. बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सीके खन्ना देखील रिसेप्शनला उपस्थित होते.


भुवनेश्वर कुमार आणि नूपुर नागरसोबत कर्णधार विराट कोहली.



चेतन पुजाराने नवीन जोडप्यासह काढलेला सेल्फी शेअर केला.



पत्नी आएशा मुखर्जीसोबत शिखर धवनने रिसेप्शनला हजेरी लावली.



दोन गोलंदाज विवाहबद्ध 


२३ नोव्हेंबरला भारतीय क्रिकेट टीममधील दोन गोलंदाज विवाहबद्ध झाले. झहीर खान अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत विवाहबद्ध झाला. तर एकीकडे भुवनेश्वर कुमार इंजीनियर नूपुर नागरसोबत विवाहबंधनात अडकला.