नवी दिल्ली : टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याची गर्लफ्रेंड नुपूर हे दोघं विवाहबद्ध झाले आहेत. या लग्न सोहळ्याचे फोटोज समोर आले आहेत.


(EXCLUSIVE फोटोज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुवनेश्वर कुमार आणि नुपूर यांचा विवाहसोहळा मेरठमध्ये पार पडला. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरने नुपूरसोबतचा एक फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. त्यावेळी आपण लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं.


भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर यांचा साखरपुडा ग्रेटर नोएडामधील एका हॉटेलमध्ये पार पडला होता. भुवनेश्वर आणि नुपूर एकमेकांचे शेजारी होते. दोघेही मेरठमधील गंगानगरमधील एकाच ब्लॉकमध्ये राहत होते.


शेजारी असल्यामळे दोन्ही परिवारांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होत असे. भुवनेश्वर कुमार आणि नुपूर या दोघांचेही वडील पोलीस सेवेत होते.



लग्नापूर्वी जे फोटोज समोर आले आहेत. त्यामध्ये भुवनेश्वर घोडीवर बसून जाताना दिसत आहे. यापूर्वी घरातून आपल्या गाडीत बसून जाताना दिसला.



ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी:


भुवनेश्वर कुमारच्या लग्नात सुरक्षा लक्षात घेऊन त्याच्या घराच्या आसपासच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी करण्यात येत आहे. 


भुवनेश्वरच्या लग्नात नातेवाईक आणि परिवारातील इतर सदस्य भांगडा करत असल्याचं दिसत आहे.



भुवनेश्वरचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर २६ आणि २९ नोव्हेंबर रोजी बुलंदशहर आणि दिल्ली येथे रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.