नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार पेसर भुवनेश्वर कुमार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच थाटामाटात त्याचा साखरपुडा पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुवनेश्वरने मेरठच्या नुपुर नागर सोबत साखरपुडा केलाय. नोएडामध्ये दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भुवनेश्वर कुमारने याआधी त्याच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर केला होता. नुपुर ही ‘बेटर हाफ’ असल्याचे त्याने सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, भुवी आणि नुपुरचं लग्न याच वर्षी डिसेंबरमध्ये होऊ शकतं. 




नुपुर ही पेशाने इंजिनिअर असून नोएडामध्ये जॉब करते. नुपुरचं कुटुंब नोएडामध्येच राहतं. भुवी आणि नुपुर हे आधीपासूनच ऎकमेकांना ओळखतात.