मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. भुवनेश्वर कुमार बाबा झाला आहे. बुधवारी सकाळी त्यांची पत्नी नुपूर नागरने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. आजी झाल्याच्या आनंदात भुवीची आई दिल्लीला रवाना झाली आहे. भुवनेश्वर कुमारचे आई-वडील मेरठमध्ये राहतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुवीच्या पत्नीने एका खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. ही माहिती देताना मेरठ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (MDCA) कोषाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले की, बुधवारी भुवनेश्वर कुमारच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. सध्या आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. भुवनेश्वर गुरुवारी त्याच्या मेरठ येथील घरी जाण्याची शक्यता आहे. .



भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर यांचं लग्न 23 नेव्हेंबर 2017 साली झालं. नुपूर सध्या दिल्लीत आहे. मुलीला पाहाण्यासाठी भुवी देखील दिल्लीला रवाना झाला आहे.